चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाखु तश्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त
चंद्रपुर : पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर यांना दिले त्या अनुषगाने पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस चंद्रपुर पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक ३०/०४/२०२४ गोपनिय बातमिदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे हनुमान श्रीकृष्ण आंबटकर, वय-३६ वर्ष, धंदा- किराणा दुकान, रा. मराठा चौक, बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर, ता. जि. चंदपुर याचे घराची सुगंधीत तंबाखु बाबत घर झडती घेवुन त्याचे घरून ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण ३,८९,८७०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी नामे हनुमान श्रीकृष्ण आंबटकर, वय-३६ वर्ष, धंदा- किराणा दुकान, रा. मराठा चौक, बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर, ता. जि. चंदपुर यास जप्त सुगंधीत तंबाकु बाबत विचारपुस केली असता त्यांनी नामे अमरदिप गुप्ता रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन,रामनगरच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/५३२ सतिश अवयरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.