इग्णीस कारात सुगंधीत तंबाखु तश्करी करीत असलेल्या तस्करांविरूध्द धडक कारवाई

चंद्रपुर :- पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांना दिले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
दि .03/05/2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहीती दाराकडुन सुचना मिळाली कि, नागपुर मार्गेवर एका ईग्नीस कार क. MH34 BF 5220 मध्ये अवैधरीत्या सुगंधीत तंबाखु भरून चंद्रपुर कडे येणार आहे. अशा गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन पडोली चौकात नाकेबंदी केली असता एक पांढरी रंगाची ईग्नीस कार संशयास्पद रित्या चंद्रपुर कडे येतांना दिसली. त्यास थांबविण्यास सांगितले असता सदर कार रोडच्या बाजुला थांबली. कार चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश राजु ईटनकर वय 19 वर्षे रा. जटपुरा वार्ड, चंद्रपुर असे सांगितले. सदर कारची पंचासमक्ष झडतीघेतली असता कारचे मागील डिक्कीत 6 बोरीमध्ये एकुण 660 ईगल हुक्का शिशा तंबाखु पॅकेट किंमत 42,240/- रू चा सुगंधीत तंबाखुचा माल तसेच चारचाकी कार किंमत 5,00,000/- रू असा एकुण5,42,240/-रू चा सदर मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन पडोली येथे आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला।
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान,पोलीस उपनिरीक्षक. विनोद भुरले, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, अजय बागेसर, नापोशि संतोष येलपुलवार, पो शिपाई नितीन रायपुरे, चापोहवा प्रमोद डंभारे यांनी केली आहे.