चंद्रपूर जिल्ह्यात कुख्यात चोर,जबरी चोर, थोकादायक व्यक्ती साहील इस्माईल शेख यास स्थानबध्द करण्यात आला

80

चंद्रपूर जिल्ह्यात कुख्यात चोर,जबरी चोर, थोकादायक व्यक्ती साहील इस्माईल शेख यास स्थानबध्द करण्यात आला

चंद्रपुर:
जिल्हातील पोलीस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर, जबरी चोर दुखापत करणारा व्यक्ती नामे साहील इस्माईल शेख वय २३ वर्ष रा. सुमित्रा नगर तुकूम चंद्रपूर यांचेवर पो. स्टे. पडोली, दुर्गापुर, रामनगर येथे चोरी, जबरी चोरी, दुखापत आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल असुन त्याची परीसरामध्ये दहशत आहे. त्याने सामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली असुन त्याने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा आरोपी कायदयाला जुमानत नसल्याने याची दखल पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर यांनी घेवुन सदर इसमावर महाराष्ट्र झोपडप‌ट्टी गुंड, हातभ‌ट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीयो पारेट्स) वाळु तस्कर अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सन १९८१ (सुधारणा २००९, २०१५) अन्वये प्रस्ताव तयार करून विनय गौडा जि. सि. भा.प्र.से.. जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता, त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवुन प्रस्तावित इसम नामे साहील इस्माईल शेख वय २३ वर्ष रा. सुमित्रा नगर तुकूम चंद्रपूर यास नमुद कायदयांतर्गत १ वर्षा करीता स्थानबध्द करण्याबाबत दिनांक ०२/०५/२०२४ रोजी आदेश पारीत केल्याने त्यास मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू मॅडम यांचे मार्गदर्शनात सुधाकर यादव, उपविभागीय चंद्रपूर, शिवलाल भगत, उविपोअधि, मुल, महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर तसेच ठाणेदार पो. स्टे. पडोली नागेशकुमार चतरकर, सपोनि योगेश खरसान, स्थागुशा चंद्रपूर, पोहवा अरून खाकर, पोहवा परवरीश शेख, सफौ कैलाश खोब्रागडे, पोअं प्रतिक हेमके, कोमल मोहते, पो. स्टे. पडोली यांनी मोलाची कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here