राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर विभागीय तीन अधिकारीवर एसीबीची कारवाई

68

राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर विभागीय तीन अधिकारीवर एसीबीची कारवाई

घुग्घुस “गोदावरी” बिअर शाॅपी करीता
मागीतली होती एक लाखाची रिश्वत

घुग्घुस : येथे गोदावरी बिअर शाॅपीचा परवाना देण्यासाठी एक लाख रू रिश्वत घेताना रंगेहात राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर विभागाचे अधीक्षक संजय पाटील,या वरीष्ठ अधिकारी सह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे,व कार्यालय अधीक्षक अभय खताळ तीघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकानी रिश्वत घेताना रंगेहात अटक करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार घुग्घुस येथील ” गोदावरी बार अँड रेस्टोरेंट ” च्या संचालकाने नविन बिअर शाॅपीच्या परवाना काढण्यासाठी नोव्हे 2023,मध्ये राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर येथे परवाना मिळवण्याठी अर्ज दाखल केले होते
चंद्रपुर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील,दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे,अभय खताल यानी तक्रारास बिअर शापीचा परवाना देण्याकरीता ताळाताळ करीत होते
चेतन खारोडे यानी तक्रारदारास बिअर शापीचा परवाना मंजुर करूण देण्याचे कामाकरीता संजय पाटील यांचे व स्व:त करीता एक लाख रू रिश्वत ची मागणी केली
या संदर्भात तक्रारदारानी लाचलुच प्रतिबंक विभाग चंद्रपुर येथे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विरूध्द तक्रार दिली या तक्रारीवरून 29 एप्रिल 2024, 3 मई 2024,आणि 2 मई 2024 रोजी करण्यात आलेल्या परताळणी कारवाई दरम्यान चेतन खारोडे यांनी तक्रारदाराकडुन एक लाख रू ची मागणी केली रिश्वत म्हणून मागण्यात आलेल्या एक लाख रू रकम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक अभय खाताड याच्या वतीने स्विकारली असतांना रिश्वत घेताना रंगेहात अटक करून लाचलुच प्रतिबंधक विभागाचे टीम आरोपी विरूध्द चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले
सदर कारवाई लाचलुच पत प्रतिबंधक नागपुर विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर,अपर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुसा भोसले,चंद्रपुर विभाग यानी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here