- प्रतिभाताई धानोरकरांच्या नामंकना करिता जनसागर उसळला
चंद्रपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातून महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीतर्फे दिवंगत खासदार सुरेश (बाळू ) धानोरकर यांच्या धर्मपत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली
आज 27 मार्च 2024 नामांकनाच्या शेवटच्या दिवशी प्रतिभा धानोरकर यांनी शक्ती प्रदर्शन करिता जेलवार्ड कोहिनूर मैदान येथून निर्धार यात्रा काढली या निर्धार यात्रेतून संपूर्ण लोकसभा क्षेत्रातून जनसागर उसळला आजच्या प्रचंड अश्या विराट रैलीने चंद्रपूर लोकसभेची ही निवडणूक भाजपचे हेवीवेट नेते सुधिर मुनगंटीवार यांना तगडा आव्हान देणारी ठरली आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे आठ महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले व या जागेवर पोटनिवडणुक झाली नाही
काँग्रेस पक्षाच्या आजवरच्या इतिहासानुसार सदर जागाही धानोरकर यांच्या पत्नीलाच मिळणार असल्याचे सर्वत्र चर्चा असतांना राज्यातील विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी सदर जागेची उमेदवारी आपल्या मुली करिता शिवानी वड्डेटीवार हिच्यासाठी मागितली यामुळे या जागेचा तिढा निर्माण होऊन ही जागा पक्ष प्रमुखांना डोकेदुखीची ठरली तर अधिकाराची उमेदवारी एका विधवा महिलेला मिळत नसल्याचे पाहून पक्ष कार्यकरते मतदार प्रचंड आक्रोशीत झाले व शेवटी सदर जागा धानोरकर यांनाच मिळाली आजच्या नामांकना करिता इंडिया आघाडीचे सर्वच पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.