चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के
घुग्घुस :
चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महाविकास आघाडीला जोरदार धक्क्यावर धक्के बसत आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसमध्ये परिवारवाद आणि हुकूमशाही असल्याची टीका करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात नुकताच प्रवेश केला.
त्या पाठोपाठ शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उज्ज्वला नलगे यांनी शिवसेनेत महिलांना मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
त्यामुळे महाविकास आघाडीला चंद्रपूर जिल्ह्यात मोठे खिंडार पडले.