काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवडणूक संदर्भात जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठक
चंद्रपुर:
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार आज दिनांक 30 मार्च रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवडनुकीसंदर्भात चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कार्यालय येथे विभागनिहाय बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विभाग व सेल संयोजिका प्रज्ञा वाघमारे, माथाडी कामगार प्रदेश प्रमुख छगन पाटील, सहकार सेल चे प्रदेश अध्यक्ष शुभांगी शेरेकर, स्वयंरोजगार सेल चे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे, उद्योग सेल चे प्रदेश अध्यक्ष हेमंत सोनारे, विज्ञान व तंत्रज्ञान सेल चे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव, झोपडपट्टी पुनर्विकास सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र हेकर, ग्राहक संरक्षण सेलचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सर्व सेलच्या जिल्हाध्यक्षांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या.
आयोजित बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी, अल्पसंख्यांक विभाग चे जिल्हाध्यक्ष मतीन कुरेशी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, ओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव उमाकांत धांडे, परिवहन जिल्हाध्यक्ष सचिन रामटेके, व्हिजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पोहनकर, स्वयंरोजगार विभागाच्या रुबिना मिर्झा, अनुताई दहेगावकर, असंघटित विभागाच्या जिल्हाध्यक्ष शालिनी भगत, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावडे, अनुसूचित सेल चे अध्यक्ष कुणाल रामटेके, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी, मोनु रामटेके, प्रकाश देशभ्रतार तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.