सुधिर मुनगंटीवार यांच्यावर गुन्हे दाखल करा

88

 

सुधिर मुनगंटीवार यांच्यावर गुन्हे दाखल करा

संतप्त काँग्रेसीचा पोलीस स्टेशन मध्येच ठिय्या आंदोलन

चंद्रपुर जिल्हातील घुग्गूस ; येथे भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 08 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोरवा येथे पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पदाधिकारी नेते व सर्व सदस्यांना उद्देशून हे सख्खे भाऊ बहिणी सोबत उघडे झोपतात अश्या स्वरूपाचे किळसवाणे व मेंदूला झिणझिण्या आणणारे विकृत विधान केले सदर विधानाने संतप्त झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चक्क पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करीत मुनगंटीवार यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वक्तव्य केल्या संदर्भात भा.दं.वी 294 नुसार कारवाई करण्याची मागणी केली.

सदर आंदोलनात काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी,जिल्हा महासचिव लक्ष्मण सादलावार,ज्येष्ठ नेते जयंता जोगी,ज्येष्ठ नेते मुन्ना लोहानी,ज्येष्ठ नेते बाबा कुरेशी,रामपाल वर्मा,एन.सी.पी शरदचंद्र पवार पक्ष नेते दिलीप पिटटलवार,शेरी कुम्मरवार,आप अध्यक्ष अमित बोरकर,तिरुपती महाकाली, माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर,अजय उपाध्ये,अलीम शेख,एस.सी.सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,युवक अध्यक्ष तौफिक शेख,अनिरुद्ध आवळे, एस.सी.सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा,इंटक जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,सोशल मिडिया लोकसभा समनव्यक रोशन दंतलवार,दिपक पेंदोर,रोहित डाकूर,भैय्या भाई,दिपक कांबळे,शमीउद्दीन शेख,कुमार रुद्रारप,विक्की मेहरकुरे,अविनाश बोबडे,सुनील पाटील,राजू लक्केवार,इंटक जिल्हा सचिव तिरुपती गोडगू,इंटक जिल्हा सचिव सदय्या कलवेणी,चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला,रफिक शेख,अविनाश बोबडे,गोलू मुसळे,केशव बोबडे,निखिल गौरकार,शैलेश बांदूरकर,अतुल बोबडे,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे, विशेष गुंडेटी,जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,जिल्हा महिला महासचिव पदमा त्रिवेणी,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल,सुजाता सोनटक्के,शिल्पा गोहिल,वैशाली दुर्योधन,आशा भांडारकर,लक्ष्मी गोदारी,अश्विनी धुर्वे, व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here