- *विकासाची डरकाळी फोडण्यासाठी चंद्रपूरचा वाघ लोकसभेत पाठवा*u
*चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी सुधीरभाऊ एकमेव पर्याय*
*भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचे प्रतिपादन*
*काँग्रेसच्या उमेदवाराचा घेतला खरपूस समाचार*
*गडचांदूर येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा*
*चंद्रपूर, दि. १४ एप्रिल – बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचा सुधीरभाऊंनी चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांनी राज्य आणि देश पातळीवर आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राजकारणात ते विकासाला जास्त महत्त्व देत असल्याने त्यांची ओळख ‘विकास पुरुष’ म्हणून केली जाते. आता ते लोकसभेच्या निवडणुकीत उभे आहेत. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हेच एकमेव पर्याय आहेत. त्यामुळे विकासाची डरकाळी फोडण्यासाठी चंद्रपूरचा वाघ लोकसभेत पाठवा, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.*
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष असलेल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ गडचांदुर येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर सौ. सपनाताई मुनगंटीवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, संजय धोटे, विधान सभा प्रमुख देवराव भोंगळे, राष्ट्रवादीचे शरद जोशी, शिवसेनेचे विक्की राठोड, रिपाईचे प्रभाकर खाडे, मनसेचे राजेश खटोड, रऊफ शेख, भाजपा नेते खुशाल बोंडे, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम,सतीश उपलेंचवार, संदीप शेरकी, डॉ. मंगेश गुलवाडे, हितेश चव्हाण, विजयालक्ष्मी डोहे, रजनी मडावी, संगीता आत्राम, रामसेवक मोरे, अरविंद डोहे, निलेश ताजने, महादेव ऐकरे, महादेव जैस्वाल, विना मुद्दलवार, शकुंतला कोसले, अपर्णा उपलेंचवार, मोना कलोडे, सुंदर दाठे, आनंदी मोरे, अॅड. दीपाली मंथनवार, शक्तीला शेख, परिकाही, सिंगरु, खंडाळे, सुषमा आवंढे, अर्चना आंबेकर, पायल येलमुले, नम्रता विश्वास यांची प्रामुख्याने उपस्थिती.
यावेळी चित्राताई वाघ म्हणाल्या की, आमचे सुधीरभाऊ राजकारणातील सज्जन व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. दारूमुळे आमच्या शेकडों आया-बहिणींचे संसार रस्त्यावर आले, त्याला प्रतिस्पर्धी उमेदवार जबाबदार आहेत. दारू विकून जिल्ह्याचा विकास होणार नसून महिलांचे कुटुंब देशोधडीला लागतील. त्यामुळे तुम्हाला “विकास हवा की विनाश” हे ठरविण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत सुधीरभाऊंना निवडून देत आपल्या जिल्ह्याचा विकास घडू द्या, विनाशाकडे वाटचाल करू नका, असे आवाहन करीत चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
याप्रसंगी जाहीर सभेला संबोधित करताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, आज मी गडचांदुर येथे असतांना रस्त्यात खड्डेच खड्डे दिसले. या भागाचा दौरा करत असतांना अनेक गावकऱ्यांनी माझी भेट घेऊन आमच्या रस्त्याचे काम, पुलाचे काम करण्याची मागणी केली. निवडणुकीत तुम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार-खासदार निवडून देता आणि पुढील पाच वर्षे ते फिरकतही नाहीत. जनतेचे एकही काम करीत नाहीत, विकास तर दूरच राहिला. जर तुम्हाला तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा, मी विकासाची गंगा तुमच्या गावात घेऊन येईल, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जाहीर सभेचे प्रास्ताविक जेष्ठ नेते महेश शर्मा, संचालन सपना शेलोकर, आभार शितल धोटे यांनी मानले.