*वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत मागे नाही,
उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे*
दुस-या दिवसी आदोलन सुरू
चंद्रपुर :
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी मंगळवार पासून विविध मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनात जवळपास 17 संघटना सहभागी झाल्या असून महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही व न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, आता मागे हटणार नाही, वीज केंद्राच्या मनमानी कारभाराला खतपाणी घालणार नाही असा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.दरम्यान राजू झोडे यांनी उपस्थित कामगारांना संबोधित केले.
वीज केंद्रातील कामगारांच्या वेतनात 30 टक्के वाढ करण्यात यावी, सर्व कामगारांना 60 वर्षापर्यंत रोजगार देण्यात यावा, त्यांना सुरक्षा देण्यात यावी, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन देण्यात यावे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे,भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, कर्तव्य बजावत असताना कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला 15 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना कामावर घेण्यात यावे, यासह इतर मागण्यांना घेऊन वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी हे कामबंद आंदोलन पुकारले आहे.दरम्यान राजू झोडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांना मार्गदर्शन केले.जो पर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.दरम्यान झोडे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. यावेळी श्यामभाऊ झिलपे, रवि पवार,गुरू भगत, मनोज बदकल , कुणाल चौधरी, टोंगे,सुरज रामटेके आदि उलगुलान संघटना च्चे कामगार व कामगार आंदोलक उपस्थित होते.
*कृपया ही बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र न्यूज चैनल व पोर्टल न्यूज चैनल वर प्रसिद्ध कराल*