मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नागपूर व चंद्रपूर दौऱ्यावर

49

बाॅननिकल गार्ड बल्लारपुर तसेच विविध विकासकामाचं भूमिपूजन व लोकार्पण करणार

नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवार दि. १२ मार्च रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल. दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता मोरवा विमानतळ हेलिपॅड चंद्रपूर येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६ वाजता मोटारीने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ६.१५ वाजता बॉटनिकल गार्डनची पाहणी व फिरते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन. रात्री ८ वाजता मोटारीने कोतवाली वॉर्ड चंद्रपूरकडे प्रयाण. रात्री ८.०५ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांचे निवासस्थानी भेट. रात्री ८.१५ वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here