- ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळाचे लेखापरीक्षण
घुग्घुस येथील सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळ सुभाषनगर/गांधीनगर याचे सन २०२२-२३ चे लेखापरीक्षण करून देण्यात आले.
आता हि संस्था कागदोपत्री सरकार मान्यप्राप्त संस्था झाली असून त्यांचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळाच्या महिलांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात येऊन भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली आणि ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंडळाचे लेखापरीक्षण करून दिल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी मंडळाच्या महिलांना लेखापरीक्षण दिले.
यावेळी सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळाच्या अध्यक्षा अल्का चुनारकर, उपाध्यक्षा अनिता कोल्हे, कोषाध्यक्षा सुमित्रा सोनटक्के, सहसचिव मंदाकिनी तेलसे सदस्य आशा गुरले, शिला पडवेकर, शोभा निखाडे, प्रेमीला नगराळे, शकुंतला कांबळे व वेणू कांबळे उपस्थित होते.