- ग्राहक पंचायत भद्रावती तर्फे जागतिक ग्राहक दिवस संपन्न
भद्रावती दि. १६ : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती तर्फे दि.१५ मार्च ला जागतिक ग्राहक दिवस कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून भद्रावती चे नायब तहसीलदार, राहुल राऊत, सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक वसंत वर्हाटे आणि जेष्ठ मार्गदर्शक पुरूषोत्तम मत्ते मंचावर उपस्थित होते.
वस्तु विकत घेतांना एम.आर.पी. पेक्षा जास्त पैसे देऊ नये, विद्यार्थ्यांनी एखाद्या शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थामध्ये भरलेली फी समाधानकारक शैक्षण न मिळाल्याने परत मागु शकता. संस्थांनी परत देण्यास टाळटाळ केली तर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करा. असे अनेक विषयावर नायब तहसिलदार, राहुल राऊत यांनी मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले यांनी ग्राहक पंचायतच्या कार्याची प्रशंसा करत ग्राहक म्हणून जागृत राहीले पाहीजे. जागृत ग्राहक राहिल्याने काय फायदे होतात ते उदाहरणासह माहीती देऊन सर्वांना सांगितले.
जेष्ठ मार्गदर्शक पुरूषोत्तम मत्ते यांनी भद्रावती शहरातील विविध समस्या ग्राहक पंचायत कशा प्रकारे सोडविते, ग्राहक पंचायत चे भद्रावती मधील कार्याबद्दल बोलले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत वर्हाटे यांनी जागतिक ग्राहक दिवसाची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला ग्राहक पंचायत भद्रावती कडून ग्राहक पंचायतीने ३५ वर्षात केलेल्या कार्याची फोटो गॅलरी लावण्यात आली होती.
सुरूवातीला मंचावर उपस्थित पाहुण्यांकडून दिप प्रज्वलन करण्यात आले. नंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रविण रामचंद्र चिमुरकर यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार वामन नामपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी, महिला कार्यकारिणी आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चौकट : *जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ला मिळाली वस्तु स्वरूपात देणगी*
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती च्या सामाजिक, ग्राहक न्यायाच्या कार्याची दखल घेत जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी धनराज आस्वले यांनी १० खुर्च्या, श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, भद्रावती यांचे कडून १० खुर्च्या देतांना शाखा व्यवस्थापक प्रज्ञा टोंगे आणि शुशांत उपस्थित होते तर विजय धारणे आणि रवि भांडारकर यांचे कडून १० खुर्च्या तर बाळकृष्ण कुटेमाटे यांच्याकडून एक टेबल अस्या वस्तू मिळाल्या याबद्दल ग्राहक पंचायत भद्रावती त्या संपूर्ण चमुकडून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.