- *बोथली येथे २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.*
- 7दिनांक :- १६ मार्च २०२४
सावली :- राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात संदर्भाधिन क्र. २ ते ८ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.
सावली तालुक्यातील मौजा. बोथली येथे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून २५ लक्ष रुपयाच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे काम मंजूर झालेले आहे. त्या कामाचे भूमिपूजन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व बोथलीचे उपसरपंच मा.विजय गड्डमवार यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय बोथलीचे सचिव मा.कुरेकर,मा.आशिष पुण्यपवार,ग्रामपंचायत सदस्य मा.शारदा पाडेवार,कविताताई अलाम तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.