शहरातील भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगा तर्फे तातळीने वॉटर टँकर सुरू करावे

52

शहरातील भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगा तर्फे तातळीने वॉटर टँकर सुरू करावे

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना राजुरेड्डी यांची निवेदनातून मागणी

घुग्गूस : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घुग्गूस शहराचा नावलौकिक आहे
यासोबतच भीषण अश्या गर्मीने शहर होरपळून निघत आहे
कूलर शिवाय जगणं कठीण आहे अश्या जीवघेण्या परिस्थिती शहरातील अनेक भागातील हँडपंपात आता पाणीच येत नसल्याने व नळाला देखील मुबलक पाणी येत नसल्याने अनेक नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे
राजुरेड्डी हे गेल्या अनेक वर्षांपासून वॉटर टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करीत आहे
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली पाणी टंचाई दूर करने शक्य नसल्याने शहरातील सर्व उद्योगांना तीन -तीन वॉटर टँकर उपलब्ध करून देण्यास सुचवावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी तहसीलदार विजय पवार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती
मात्र अजून पर्यंत अंमलबजावणी न झाल्याने काँग्रेसतर्फे आज दिनांक 02 एप्रिल रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली आहे

यासोबतच सध्या शहर भरात वॉटर टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा हा वेकोलीच्या फिल्टर प्लांट मधून होत असतो

मात्र यारस्त्याने पाणी पुरवठा करणे प्रचंड त्रासदायक व वेळखर्ची करणारा आहे याठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाचे निर्माणकार्य शुरु असल्याने तसेच रेल्वेगेट वारंवार बंद होत असल्याने पाणी आणणे अत्यंत कठीण झालेले आहे
करिता शहरातील मध्यभागी असलेल्या लॉयड्स कंपनी व एसीसी कंपनी तर्फे ही पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याने याकंपन्या तर्फे वॉटर टँकर भरण्यासाठी एक – एक पाणी पॉईंट उपलब्ध करून देण्याची ही मागणी रेड्डी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here