Rccpl सिमेंट,परसोडा लाईमसटोन लिज प्रकरणी,पेसा अनुसूचित ग्रामपंचायत अनुमती मध्ये मृत व निरक्षर लोकांच्या बनावट सह्या पंचायत समिती कडून अहवाल पाठवूनही
उपविभागीय अधिकारी चे चौकशी व कार्यवाही मध्ये दिरंगाई का?
कोरपणा:-Rccpl सिमेंट कंपनी ला,पेसा अनुसूचित परसोडा ग्रामपंचायत , तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर,कडून वर्ष 2020 मध्ये नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. ह्या नाहरकत प्रमाणपत्र देताना, स्थानिक प्रकल्पग्रस्ताचे बनावट व खोटे सह्या करून कंपनी ला देण्यात आले होते. ह्या विषयावर अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली असता, हे उघड झाले आहे. ह्या संदर्भात मा.राष्ट्रपती, मा.पंतप्रधान आफिस,मा. अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकारी ने पंचायत समिती कोरपना ह्यांना चौकशी करण्यासाठी आदेश दिले होते. पंचायत समिती कोरपना कडून पेसा अनुसूचित परसोडा ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक लोकांचे सह्या ची चौकशी करण्यात आली होती, उपस्थित स्थानिक लोकांना पुर्व सुचना न देता,व अधिकारी उशिरा आल्याने, उपस्थित चार लोकांचे बनावट सह्या, तिन मयत लोकांचे सह्या , निरक्षर लोकांच्या बनावट सह्या असे पंचनामा बनवून उपविभागीय अधिकारी राजूरा ह्यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी पाठविण्यात आले होते. सहा महिने होऊनही अद्याप उपविभागीय अधिकारी राजूरा कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाहीत. Rccpl कंपनी व प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर कडून,पेसा अनुसूचित ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यावरण जनसुनावणी न घेता, 100 किमी दूर अंतरावर चंद्रपूर येथे घेण्यात आले होते.तेथे कंपनीने दलाल मार्फत आणलेल्या व्यक्ती कडून, प्रकल्पग्रस्ताचे बनावट सह्या केल्या होत्या. ह्या प्रकरणात वारंवार तक्रारी देऊन ही अद्याप कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. पेसा आदिवासी ग्रामपंचायत क्षेत्रात बनावट सह्या चे घोटाळा होऊन, मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊन ही, पंचायत समिती ने तसा अहवाल देऊन ही उपविभागीय अधिकारी राजूरा चे कार्यवाही न करने हे संशयास्पद वाटते, स्थानिक प्रकल्पग्रस्ताचे मागणी आहे कि, लवकरात लवकर ह्या विषयावर कार्यवाही करण्यात यावी, असे अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता, गंगाधर कुंठावार, नेमीचंद काटकर,सखाराम तलांडे ह्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.