ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गरीब विद्यार्थीनीला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत

55
  1. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गरीब विद्यार्थीनीला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत

घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे बुधवार, १० एप्रिल रोजी एका गरिब विद्यार्थीनीला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

माधुरी राम रा. बंगाली कॅम्प, घुग्घुस या विधवा महिलेची मुलगी अलीना राम ही इरा शाळेत केजी २ वर्गात शिकते. तिच्या वडिलाचा अपघातात मृत्यू झाला होता व तिची आई माधुरी राम ही रोजमजुरीचे काम करते गरिबीची परिस्थिती असल्याने राम कुटुंबियांजवळ मुलगी अलीनाचे शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व ही समस्या सांगितली.

ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी तत्काळ राम कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. त्याअनुषंगाने राम कुटुंबियांनी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे व राम कुटुंब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here