गुढीपाडव्यानिमित्त प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे भव्य दुचाकी रॅली.

घुग्घुस :
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्ष वर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा त्याग, मांगल्य व सात्विकतेच प्रतिक असलेला हिंदूचा नववर्ष दिन घुग्घुस शहरात महिलांची भव्य दुचाकी रॅली काढून गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव प्रयास सखी मंच घुग्घुसच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रयास सखी मंच घुग्घुसच्या वतीने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचा प्रारंभ माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भगवा ध्वज दाखवून केला.
बसस्थानक, बहिरमबाबा नगर, मार्गे मार्गक्रमण करीत दुचाकी रॅलीचे समापन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि.प. चिन्नाजी नलभोगा, माजी सदस्य सिनु इसारप, जिल्हा सचिव विनोद चौधरी, भाजयुमोचे अमोल थेरे, सुनील बाम, प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी जि.प. सभापती नितू चौधरी, माजी सदस्य पूजाताई दुर्गम, माजी सदस्य वैशालीताई ढवस , माजी सदस्य सुचिता लुटे, माजी सदस्य सुषमा सावे, माजी सदस्य नंदा कांबळे, शंकर सिद्धम, सुरेन्द्र जोगी, धनराज पारखी, तुलसीदास ढवस, सिनू रामटेके, मल्लेश बल्ला, नितीन काळे, सुरेंद्र भोंगळे, कोमल ठाकरे, पियूष भोंगळे, प्रणय बोकडे, विनोद जंजर्ला, विवेक तिवारी, वमशी महाकाली, इर्शाद कुरेशी, मानस सिंग, स्वप्नील इंगोले, वृंदाताई भोंगळे, विनाताई बांगडे, सुनंदाताई ठाकरे, सुनीताताई घिवे, सरिताताई इसराप, सीमाताई पारखी, सारिकाताई भोंगळे, लक्ष्मीताई नलभोगा, व मोठया संख्येत दुचाकीस्वार महिला उपस्थित होत्या.