भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस सत्कार करुन केली 133 वी भीम जयंती साजरी
घुग्घुस – आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस चा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे. भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस व समता सैनिक दल घुग्घुस, यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चा वतीने 133 व्या जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पंचशील बौद्ध विहार घुग्घुस, येथे सकाळी 10 वाजत सर्व बौद्ध बांधव विहार येथे एकत्रित येऊन समता सैनिक दलाचा परेड मध्ये नगर परिषद घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन मानवंदना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, मायाताई सांड्रावार केंद्रीय शिक्षिका
विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे समता सैनिक दल अध्यक्षा अश्विनीताई सातपुते यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, उपाध्यक्षा प्रतिमाताई कांबळे सचिव स्मिताताई कांबळे
त्यानंतर नगर परिषद घुग्घुस इथुन परत पंचशील बौद्ध विहार घुग्घुस इथे जयंती चा माध्यमातून ज्या बुजुर्ग 65 वर्षापासून सामाजिक कार्य केले अशा सामाजिक कार्यकर्त्यांला ज्यामध्ये संभाजी पाटील, दिगांबर बुरड, बापुराव कांबळे, लक्ष्मण टिपले, चंद्रगुप्त घागरगुंडे यानी सामाजिक चळवळ आजपर्यंत सुरु ठेवली यांना शिल्ड शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
नवनवीत पंचशील बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू आहे त्या विहार बांधकामा करीता दान दात्यांनी मोठ्या प्रमाणात दान केले. 1) मा. कवडु लटारुजी रामटेके यांनी 3,55,000/-
2) मा. मनोहरजी नगराळे यांनी 95,000/- हजार
3) मा. जनार्दन जिवने यांनी 65,000/- हजार
4) सुरेश लटारुजी रामटेके यांनी 51,000/- हजार रुपये
5) मा. हेमंत आनंदराव पाझारे यांनी 40,000/-दान दिले यांना भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस यशोधरा महिला मंडळ घुग्घुस तर्फे सन्मान चिन्ह सन्मान पत्र शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच भीम जयंती कार्यक्रमाला उद्देशून 6 व 7 फेब्रुवारी 2024 रोजी राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती यशोधरा महिला मंडळ घुग्घुस अध्यक्षा रिताताई देशकर व सचिव स्मिताताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रम मध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सहभागी ला सन्मान पत्र शिल्ड देऊन प्रोत्साहन करण्यात आले.
सायंकाळी 6 वाजता घुग्घुस येथील सर्व बौद्ध विहार पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे एकत्रित येऊन मिरवणूक रॅली काढण्यात आली हि मिरवणूक पंचशील बौद्ध विहार, गांधी चौक, बँक ऑफ इंडिया व समारोपीय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा जवळ शांततेत पार पडला
या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा महिला मंडळ कोषाध्यक्षा रमाबाई सातारडे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, मायाताई सांड्रावार केंद्रीय शिक्षिका विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे समता सैनिक दल अध्यक्षा अश्विनीताई सातपुते यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, उपाध्यक्षा प्रतिमाताई कांबळे सचिव स्मिताताई कांबळे