TDRF कडून नवी दिशा वृद्धाश्रम घुगघुस येथे फळे बिस्कीट व छाच वाटप करण्यात आले
घुगघुस :
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफला ९ मे रोजी १९ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्य १ ते ९ मे दरम्यान टीडीआरएफ वर्धापनदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने ९ मे २०२३ रोजी घुगुघुस ता. चंद्रपूर कंपनी च्या जवानांकडून कडून मा. टीडीआरएफ संचालक हरिश्चंद्र ब.राठोड व मा. TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुस्कान ज. सैय्यद यांच्या मार्गदर्शनात फळे बिस्कीट छाच वाटप करण्यात आले सोबतच जनता हायस्कूल येथे स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.वर्धापन दिन महोत्सवांर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी नवी दिशा वृद्धाश्रम चे मुख्य सुनील जुमनाके, सामाजिक कार्यकर्ता रेखा कैथल ही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी टीडीआरएफ चे घुगुस कंपनी वेदिका येरकाडे, वितेश वंजारी, प्रता केथल,खुशबू पुरडकर,गुंजन खुसपूरे,कामाक्षी झोडे,रुषाली ठावरी,श्रुती कांबडे,शंकर बावणे,कोमल सुरतेकर,अक्षरा डंभारे,मानसी देऊरकर,दीक्षा पाल,नंदनी बहुरिया,आचल आस्वले,प्राची आसुटकर,नीलम वर्मा,नेहा वर्मा,श्वेता आसुटकर,सेजल भुसे इत्यादी TDRF जवानांनी परिश्रम घेतले.