घुग्घूस शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईत भेदभाव करू नये : राजुरेड्डी घुग्घूस : शहरातील बसस्थानक चौक व लॉयड्स मेटल्स कंपनी

92

घुग्घूस शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईत भेदभाव करू नये : राजुरेड्डी

घुग्घूस : शहरातील बसस्थानक चौक व लॉयड्स मेटल्स कंपनी प्रवेश द्वार परिसरातील छोटे व्यापारी हे गेल्या अनेक वर्षांपासून आपले दुकाने चालवीत आहे
याच दुकानाच्या भरवश्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो मात्र सदर दुकाने हटविण्या संदर्भात नगरपरिषद मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्या तर्फे नोटीस देण्यात आलेले आहे
व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने न उठविल्यास जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्यात येईल अशी धमकी ही देण्यात आली आहे
मात्र ही कारवाई एकतर्फी आहे घुग्घूस शहरात पोलीस स्टेशन ते बँक ऑफ इंडिया परिसरात तहसील कार्यालया समोर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर भाजप पक्षाने शासकीय जागेवर अतिक्रमण करून सेवा केंद्र नावाचा कार्यालय थाटला आहे

नगरपरिषदेने अतिक्रमण हटविण्या संदर्भात एकतर्फी कारवाई करू नये पालकमंत्र्या साठी वेगळा न्याय व गरीब व्यापाऱ्यांना वेगळा न्याय अशी भूमिका घेऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांना रेड्डी यांनी निवेदनातून केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here