दुकानदारांना आधी जागा उपलब्ध करून द्या नंतर अतिक्रमण हटवा : राजुरेड्डी

56

दुकानदारांना आधी जागा उपलब्ध करून द्या नंतर अतिक्रमण हटवा : राजुरेड्डी

घुग्घुस : शहरातील बस स्थानक चौक तसेच लॉयड्स मेटल्स कंपनीच्या समोरील भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते,नाश्ता विक्रेते,चायनीज स्टॉल,व अन्य छोटे व्यापारी गेले अनेक वर्षांपासून सदर जागेवर आपली दुकाने चालवीत असून नगरपरिषदेला नियमितपणे कर ही देत आहेत

याच दुकानाच्या भरवश्यावर यांच्या कुटुंबाची जीविका चालत असते हे दुकाने हटविल्यास यांच्या पोटावर पाय पडेल शहरातील विकासा करिता अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्यास यात पक्षपातीपणा करण्यात येऊ नये राजकारण्यांच्या अतिक्रमणाला सूट आणि गरिबांच्या अतिक्रमणावर कारवाई हे चुकीचे असून आधी या दुकानदारांना बस स्थानक लगतची खुली जागा उपलब्ध करून द्या नंतर अतिक्रमण हटवा अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here