वेकोलिच्या कोळसा खदानीत स्थानिक चालक मालकांना रोजगार द्या,
अन्यथा रस्त्यावर उतरू राजु झोडे(उलगुलान संघटना अध्यक्ष)यांचा इशारा
- चंद्रपुर :
चंद्रपुर जिल्हातील वेकोलीच्या बल्लारपूर,राजुरा ,धोपटाळा,सास्ती,गौरी,पवनी,साखरी,कोळसा खाणीत मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ट्रक चालक मालक कोळसा वाहतुकीचे काम करत आहेत.मात्र आता त्यांच्या हाताला काम मिळत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून स्थानिक ट्रक चालक मालकांना रोजगार द्या अन्यथा स्थानिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.तसे निवेदन राजुरा तहसीलदार यांना देण्यात आले.
बल्लारपूर-राजुरा तालुक्यातील धोपटाळा कोळसा खाणीत मागील अनेक वर्षांपासून जवळपास 250च्या वर ट्रक चालक मालक काम करत आहेत. मात्र यात कोळसा वाहतुकीचे अनेक मोठ्या ट्रान्सपोर्टस ला काम देण्यात आले असून स्थानिकांना डाववले जात असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळं उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना काही कामगारांनी आपबीती सांगितली असता झोडे यांनी तात्काळ दखल घेत राजुरा तहसीलदार यांची भेट घेतली व लवकरात लवकर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा राजू झोडे ,रसिया निषाद, मंसूर चच्चा, राजनारायन यादव, नंदन शर्मा, संतोष वर्मा, शम्मी सिद्दीक़ी नरेश गुंड्डापल्ली शमशुल ,राजा निषाद यांनी दिला आहे.