बल्लारपुर गवरी 1 च्या खाणीत भंगार माफियांची टोळी सक्रिय,हजारो टनाच्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांची मोठी नजर

33

  बल्लारपुर गवरी 1 च्या खाणीत भंगार माफियांची टोळी सक्रिय,हजारो टनाच्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांची मोठी नजर

बल्लारपुर:
चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत गवरी 1 च्या खाणीत भंगार माफियांची टोळी 15 ते 20 टोळी सक्रिय असून, हजारो टनाच्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांची मोठी टोळी गॅस कॅटरच्या साह्याने डंपर वर्कशॉपच्या परिसरात भंगार माफियांच्या धूमाकुळ‌‌‌,झाडी – झुडपात पडलेले डंपर व डंपरचे स्पेअरपार्टचे अंदाजे हजारो टनाच्या लोखंडी साहित्य कॅटरच्या साह्याने कापुन चोरी सर्रास रात्रिच्या सुमारास धुमाकूळ‌‌‌ करीत आहे,याकडे वेकोलीच्या सुरक्षा रक्षक व ईतराच्या दुर्लक्ष का? तसेच या भंगार चोरट्यांची साटेलोटे पोलीस निरीक्षक यांचे असल्याची चर्चा जोमाने नागरिकात व सामाजिक कार्यकर्तांकडून केली जात आहे, व एलसीबी पिआई यांचे आर्शिवाद असल्याची चर्चा जोमाने नागरिकात सुरुच,येत्या चार पाच दिवसापासून या भंगार चोरट्यांनी या खाणीत धुमाकुळू करीत आहे, या कडे वेकोली वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष द्यावे व या ठिकाणी सुरक्षा रक्षक व MSF सुरक्षा कर्मचारी यांना तैनात करण्यात यावे, टोळीच्या भंगार माफिया चोरी चंद्रपुर च्या लखमापुर च्या निवासी असल्याची चर्चा जोमाने नागरिकात सुरुच, हजारो लोखंडी साहित्यावर या चोरट्यांची नजर चार ते पाच दिवसापासून गॅस कॅटरच्या साह्याने कापुन नेत असल्याने येथील काही सुत्रांकडून माहिती व स्थानकांकडून मिळत आहे, या अंकूश लावून भंगार माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जनमानसात होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here