गडचिरोली येथे रविवारी नाट्यश्री कविसंमेलन व *महापूजा* महानाट्याचे प्रकाशन.
स्थानिक ‘नाट्यश्री’ च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार “चुडाराम बल्हारपुरे” लिखीत व मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित “महापूजा अर्थात महासती सावित्री” या महानाट्याच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या २६ तारखेस नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक डॉ. बळवंत भोयर यांचे हस्ते केमिस्ट भवन, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर हे राहणार असून, प्रा. डॉ . विशाखा सचिन कांबळे, मॉरिशस कॉलेज, नागपूर हे प्रमुख अतिथी म्हणून हजर राहणार आहेत.
प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, सिंदेवाही हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत. तर प्रा. डॉ. योगीराज नगराळे, तळोधी(बा) हे नाट्य समीक्षण करणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून विदर्भातील प्रसिद्ध कवी मा. नागोराव सोनकुसरे नागपूर हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी महापूजा नाटकातील ज्येष्ठ कलावंत माणिक महाराज बांगरे, विठ्ठल खानोरकर व नवोदित कवयित्री वंदना मडावी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नाट्यश्रीचे कलावंत व संगीतकार विठ्ठल खानोरकर, दिवाकर बारसागडे, विजया पोगडे, केवल बगमारे हे महामृत्युंजय मार्कंडेश्वर या नाटकातील नांदी, स्वागतगीत व “महापूजा” या नाटकातील नाट्यगीते सादर करणार आहेत.
या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून चंद्रपूर, भंडारा , गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील ५२कवी सहभागी झालेले आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी, साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री चे दादा सुंदरकर, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा. अरुण बुरे, मारोती लाकडे, निरंजन भरडकर, प्रभाकर गडपायले, राजेंद्र जरुरकर, गुणवंत शेंडे व सौ. कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.