शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत न विकता दान करा स्माईल फाउंडेशनचा उपक्रम, गरजूंना वाटप केले जाणार पुस्तकं

39
शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत न विकता दान करा
स्माईल फाउंडेशनचा उपक्रम, गरजूंना वाटप केले जाणार पुस्तकं

वणी: शाळा संपली, पुढच्या वर्गात विद्यार्थी गेला की त्याचे नवे घेतलेले पुस्तके पडून राहतात किंवा रद्दीत दिले जातात. मात्र ही पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना कामात येऊ शकतात. वर्ग 1 ते 12 वी पर्यंतची पुस्तके, नोट्स, गाईड्स तसेच (नोटबुक, कंपास, स्केचपेन, कलर बॉक्स) असे कोणतेही स्टडी मटेरिअल हे रद्दीत न विकता किंवा पडून असल्यास दान करा. हे साहित्य गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जाईल. स्माईल फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अधिक माहितासाठी प्रा. जागर जाधव 7038204209 या क्रमांकावर किंवा वॉटर सप्लाय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळेसाठी अनेक पालक विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं विकत घेऊन देतात. मात्र पाल्य पास झाल्यावर त्याचे पुस्तके बरेचदा घरी पडून राहतात. प्रसंगी ते रद्दीत कवडीच्या भावाने विकली जातात. मात्र यातील अनेक पुस्तके वापरण्याजोगे असतात. व ही पुस्तकं गरजुंच्या शिक्षणाच्या कामात येऊ शकतात. ही पुस्तके स्माईल फाउंडेशन गोळा करून गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दान करणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जुनी पुस्तके तसेच शैक्षणिक साहित्य दान करा असे आवाहन करण्यात आले आहे.

काय करता येणार दान?
वर्ग 1 ते 12 वी पर्यंतचे स्टेट बोर्ड व सीबीएससी बोर्डचे पुस्तकं दान करता येणार आहे. याशिवाय कंपास बॉक्स, स्केचपेन, नोटबुक इत्यादी देखील दान करता येणार आहे. जर कुणाला नवीन साहित्य देण्याची इच्छा असेल तर त्यांना नवीन साहित्य देखील देता येणार आहे.

स्माईल फाउंडेशन हे परिसरातील एक सुपरिचित सेवाभावी संस्था आहे. संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पुरक उपक्रम राबवले जातात. अधिक माहितीसाठी सागर जाधव, संस्थापक स्माईल फाउंडेशन यांना संपर्क साधता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here