‘महापूजा या महानाट्यातील
प्रेरणादायी आणि तत्वमुल्यगर्भता कथानकाला अधोरेखित करते.
-ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक डॉ. बळवंत भोयर.
———————————-
*गडचिरोली -* झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे लिखीत *‘महापूजा अर्थात महासती सावित्री* ‘ या महानाट्याच्या पुस्तकाचे विमोचन गडचिरोली येथील केमिस्ट भवनात ज्येष्ठ रंगकर्मी साहित्यिक, कवी व समिक्षक डॉ . बळवंत भोयर यांच्याहस्ते थाटात पार पडले. या महानाट्यातून जिवनाचे वास्तव उमटल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्याम मोहरकर, ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक हे होते, तर प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम यांनी पुस्तकावर भाष्य केले. विशेष अतिथी म्हणून साहित्यिक , कवी व रंगकर्मी असलेल्या मॉरिशस कॉलेज, नागपूर येथील प्रा. डॉ. विशाखा कांबळे व विदर्भातील ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे हे उपस्थित होते. ‘झाडीपट्टीतील ५१ कलावंत व १५ तंत्रज्ञांना एकत्र आणण्याचे व त्यांच्या कलेला उजागर करुन “महापूजा” सारखे महानाट्य रंगमंचावर साकारण्याचे व आज तेच नाटक पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य चुडाराम बल्हारपुरे यांनी महापूजाच्या रूपाने लिलया पेलले आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.’ असे प्रतिपादन डॉ . श्याम मोहरकर यांनी केले. सोबतच त्यांनी “महापूजा अर्थात महासती सावित्री” या नाटकातील विविध प्रसंगांवर समिक्षणात्मक विवेचन केले.
प्रसंगाचे औचित्य साधून नवोदित कवयित्री सौ. वंदना मडावी यांचे नुकतेच “माळ विखूरलेल्या मोत्यांची” हे पुस्तक प्रकाशित झाल्याबाबत व विदर्भातील ऐंशी वर्षीय ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे यांच्या कविता अमेरिकेत सादर झाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाष्यकार प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम यांनी नाटकावर समिक्षणात्मक भाष्य करतांना त्यातील अनेक प्रसंग व घटनावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी नाट्यश्रीचे संगीतकार विठ्ठल खानोरकर, गायिका विजया पोगडे, प्रसिद्ध नाट्यकलावंत दिवाकर बारसागडे, व केवळ बगमारे यांनी नांदी द्वारे नटेश्वराची आराधना केली. व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच “महापूजा” नाटकातील नाट्यगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
प्रकाशन सोहळ्याचे सुत्र संचलन प्रभाकर गडपायले व गुणवंत शेंडे, प्रास्ताविक दिलीप मेश्राम यांनी केले. लेखकीय मनोगत नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी व आभार दादाजी चुधरी यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, राजू चिलगेलवार, मारोती लाकडे, निरंजन भरडकर, राजेंद्र जरुरकर, गजानन गेडाम, वसंत चापले, हेमंत कावळे, जितेंद्र उपाध्याय, व चुडाराम बल्हारपुरे यांनी सहकार्य केले.
या सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात कविसंमेलन घेण्यात आले. त्यात ५२ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
————————————————
*नाटयश्रीच्यावतीने नऊ मान्यवरांना “नाट्यश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.*
प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, डॉ.बळवंत भोयर, प्रा. डॉ . विशाखा कांबळे, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे, कवयित्री वंदना मडावी, ह.भ.प. माणिक महाराज बांगरे, संगीत दिग्दर्शक विठ्ठल खानोरकर इ. मान्यवरांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
———————————-