एफ ई एस गर्ल्स कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदावर प्रा. डॉ. राजेश चिमनकर यांची नियुक्ती
चंद्रपूर दि. 28 : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारासंचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेजच्या ग्रंथालय प्रमुख प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मिनाक्षी ठोंबरे यांनी वैयक्तिक कौटुंबिक कारणामुळे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. व्यवस्थापन मंडळाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला व प्रभारी प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारून संस्थेला दिलेल्या सेवे करता डॉ. मिनाक्षी ठोंबरे यांचे व्यवस्थापन मंडळाने आभार मानले.
दिनांक 25 मे 2024 ला झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या सभेमध्ये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा कार्यभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेश चिमनकर यांच्याकडे देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आलेला आहे. ही सभा संस्था अध्यक्ष ऍड. विजय मोगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या सभेला संस्थेचे सचिव ऍड. पुरुषोत्तम सातपुते सहसचिव श्री केशवराव शेंडे कोषाध्यक्ष श्री देवानंद खोब्रागडे कार्यकारणी सदस्या श्रीमती शांताबाई पोटदुखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सभेतील ठरावानुसार प्रा. डॉ. राजेश चिमनकर हे दिनांक 01 जून 2024 पासून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यासाठी व्यवस्थापन मंडळ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. डॉ. राजेश चिमणकर यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.