- वारंवार विजेच्या लंपडावाने त्रस्त नागरिकांचा महावितरण अधिकाऱ्यांचा घेराव
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील हा सर्वात प्रदूषित व उष्ण शहर आहे
हा औद्योगिक शहर असल्याने मजूर वर्गांची संख्या खूप मोठी आहे.
नागरिक इतक्या प्रचंड उष्णतेत
दिवसभर काम करतात मात्र महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना रात्री झोप ही घेता येत नाही.
दिवसात अनेक वेळा वीज ही येत जात असते मात्र रात्रीच्या वेळेस शहरातील अनेक भागात वीज ही रातभर बंद असते नागरिक महावितरण कार्यलयात तक्रारी साठी जातात मात्र त्याठिकाणी कुणी ही राहत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे
यामुळे प्रचंड संतापलेल्या महिला पुरुषांनी दिनांक 28 में रोजी सांयकाळी 06 वाजता महावितरण कार्यलयाला घेराव घालून महावितरण अधिकाऱ्यांना
जाब विचारला असता त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की रात्री पाळीत कर्मचारी ठेवल्या जातील वीज गळती थांबविण्यासाठी अनेक ठिकाणी तातळीने कामे शुरु करून या समस्येवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन पेंदोर व मुख्य अभियंता पवार यांनी दिले तसेच शहरात अजून ही ग्रामीणचाच दर्जा असून कर्मचाऱ्यांची खूपच कमी असल्याने यावर आम्ही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,विशाल मादर,जोगेंद्र भंडारी,देव भंडारी,सुनील पाटील,रफिक शेख,सचिन नागपुरे,कपील गोगला,अंकुश सपाटे,रंजित राखूडे,बालकिशन कुळसंगे,व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते