उसगाव येथे गंगा दशहरा महोत्सव
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या उसगाव येथील श्री संत शिरोमणी काशिनाथ महाराज देवस्थान येथे शुक्रवार, ७ जुन ते रविवार, १६ जुनपर्यंत गंगा दशहरा महोत्सव तथा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.वढा येथील संगमावरून भजन,दिंडी,कलश याञा,स्वामी चैतन्य महाराजाचे वर्धा नदीत स्नान होऊन पालखी व कलश याञा काढण्यात येणार आहे
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दशहरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज भजन, किर्तन,आरती,नित्यपाठ, पूजन,हरीपाठ, मासीरकर गुरूजी,डोमाजी वानखेडे,विलास आवारी बाळाभाऊ निखाठे, पुडलिक खन्ळ,सुखदेवराव सुळके,याच्याकडून किर्तन भजन तसेच कार्यक्रमात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी कार्यक्रमाचा येऊन भजन,किर्तन, आरती, दिडी याञा, कलश याञा,नित्यपाठ, हरीपाठ, तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत काशीनाथ महाराज देवस्थान भावीक भक्त व समस्त गावकरी मंडळ उसगाव आयोजकांनी केले आहे.