राष्ट्रसंत तूकडोजी महाराज मंदिर एकार्जुना येथे विश्व व्रुध्य दुर्व्यवहार जागरुकता दिवसांमध्ये मार्गदर्शन
सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या.

दिनांक १५ जून हा दिवस संपुर्ण जगभर विश्व व्रुध्य दुर्व्यवहार जागरुकता दिवस किंवा वर्ल्ड एल्डर अब्युस अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो.त्यात वृध्द लोकांसाठी जनजागृती माहीतीचा प्रचार व प्रसार करुन मनोधैर्य वाढविण्यासाठी मदत केली जाते.अश्याच एका कार्यक्रमात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी वृद्ध व्यक्ती महीला व पुरुष यांना मनोधैर्य वाढविणारे उपाययोजना सांगितल्या.कोणत्याही प्रसंगी खच्चून न जाता धैर्याने संकटाला तोंड देवुन सामोरे जायचे. या कार्यक्रमाद्वारे मनोबल वाढविले.कोणत्याही परिस्थितीत वाद घालू नये.आणी शांततेने आपले जिवन घालवावे.त्यासाठी एकमेकांना भेटने,योगा, प्राणायाम,मेडिटेशन, व्यायाम,करणे . नातवंडांबरोबर खेळणे.एखादा छंद जोपासने.भक्ती मार्गाचा अवलंब करणे.आजकालची पिढी सुशिक्षित आहेत पण म्हातार्या आई वडिलांना,सासू सासरे यांना मानादानाने वागवत नाही.हेळसांड करतात.तर सर्वांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे..आजी आजोबा यांचें प्रेम नातवंडांना आवश्यक असते.एकत्र कुटूंब पध्दती खूप जरुरी आहे.मूलाबाळांवर चांगलें संस्कार होतात.पण आजकाल ते समजतं नाही.विषषेत्वाने या कार्यक्रमामध्ये आजी आजोबा आणि नातवंडे यां मध्यें सहभागी झाले होते.खूप छान तिनं पिढ्यांचा संगम घडवून आणण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता.तसेच या कार्यक्रमाला वरोराचे भावना लोया जज, लवीना वकिल, रत्नमाला अहीरकर सामाजिक कार्यकर्त्या, योगिता लांडगे सामाजिक कार्यकर्त्या,ऊज्वला थेरे सरपंच ,पोलिस पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आणी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी रशीदा शेख व डाॅ .राजरत्न मून वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली.एकंदरीत व्रुध्दांना मानसीक आधार देवून,कायदे व नियम समजून सांगितले.आणी आनंदी जीवन जगण्याचा आधार व सल्ला देण्यात आला.नातवंडानी आजी आजोबांना भेटायचं,विचारायचं , समजून घ्यायचं हे ठासून सांगण्यात आले.कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये.हेही सांगण्यात आले.नेत्रदान, अवयव दान रक्त दान देह दान यांचे महत्व समजावून सांगितले आणि ते दान करण्याचें आवाहन केले.आणी नेत्रदानाचे माहिती पत्रकाचे वाटप केले.फार्म भरण्यासाठी समजावून सांगितले.










