ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ‘लाडकी बहीण’ लाभार्थ्यांची गर्दी
घुग्घुस : महायुती सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली असून, यातील अटी शिथिल करण्यात आल्या आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून त्यांना मदतीचा हात दिला आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ घोषित झाल्यानंतर कागदपत्रे सादर करण्यासाठी घुग्घुस शहरातील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली.
आतापर्यंत शेकडो लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून देण्यात येत आहे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र हे शासकीय योजना, दाखले काढून देण्यात अव्वल स्थानी आहे.