कोलकता हत्याकांडातील आरोपीला तत्काळ फाशी द्या- किरण बोढे
घुग्घुस : येथील प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देत कोलकता हत्याकांडातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
कोलकता येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अत्याचार करून खून करण्यात आला. या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांची संघटना निषेध व आंदोलन करीत आहे.
त्याअनुषंगाने प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी शिष्टमंडळासह पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे यांची भेट घेतली व चर्चा करून कोलकता हत्याकांडातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून केली.
याप्रसंगी किरण बोढे म्हणाल्या, ही घटना खूप नींदनीय असून मानवतेला कळिमा फासणारी आहे. अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, भाजपाच्या सुचिता लुटे, वैशाली भोंगळे, अमीना बेगम, सुनीता घिवे, सुनीता पाटील, नाजमा कुरेशी, सिमा पारखी, वंदना मुळेवार, माया चंदनखेडे, पुष्पा जानवे, आशा हजारे, सुरेखा दडमल, पुजा देशकर, सविता बांदूरकर, केतकी घोरपडे, अर्चना लेंडे, नंदा चिमुरकर, अर्चना बरडे, अमृता सोदारी, जोत्स्ना मडावी, सुनीता कुशवाह, गीता पाचभाई, सिमा दडमल, नम्रता सोदारी, शोभा रणदिवे, अर्चना बुंदे, शीतल रणदिवे, जायदा बेगम, बयना ठेपाले, माधुरी ठेपाले, अर्चना पोहीणकर आदींची उपस्थिती होती.