Home Breaking News राजुऱ्यातील वाढते अपराध व अवैध धंद्यावर लगाम घाला

राजुऱ्यातील वाढते अपराध व अवैध धंद्यावर लगाम घाला

105

राजुऱ्यातील वाढते अपराध व अवैध धंद्यावर लगाम घाला



कर्तव्यदक्ष पो निरीक्षक नियुक्त करण्यासाठी शंतनू धोटे यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन


नितेश केराम
राजुरा पोलीस स्टेशन राजुरा अंतर्गत मोट्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे परिसरातील सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व चितेचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे lps श्री अनिकेत हिरडे आणि असे कर्तव्यदक्ष अधिकारी जोपर्यंत राजुरा पोलीस स्टेशन मध्ये सेवा देत होते तेव्हा राजुरा येते परिस्थिती बऱ्यापैकी सुव्यवस्तीत दिसून आली.
मात्र असे कर्तृत्ववान अधिकारी येथून गेले पासून तालुक्यात दारू कोळसा जुगार सट्टाभटी जनावर तस्करी भंगार चोऱ्या अवैध दारू गांजा चरस एम डी इंगज विक्री सारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे .
राजुरा सारख्या शांतमय शहरात काल परवाच एका महिलेचा आज्ञाताकडून खून झालेला आहेत यातून पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कमी होत असल्याच्या दिसून येत आहे .
त्यामुळे सर्व अवैध धंधावर लगाम ठेवण्यासाठी येते या सर्व समाजविघातक घटनांवर अंकुश ठेवणारे कार्यतस्पर अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करून कायदा व सुव्यवस्ता आबाधित ठेवावी.
अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कडे प्रत्येक्ष भेटून निवेदनाद्रारे केली आहे.
दरम्यान त्याच्या या मागणीवर पोलीस अधिकक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राजुरा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधिक राखण्यासाठी आवश्यक पावले प्रशासनाहीकडून घेतली जाते अशी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here