स्वतःचे राहते घरात अवैध्यरित्या तलवार व एअर पिस्टल विनापरवाना बाळगूण मिळून आलेल्या ईसमांवर कारवाई केल्याबाबत
वरोरा :
दिनांक २३/०८/२०२४ रोजी मुखबीर द्वारे खबर मिळाली की, जाकीर अयुब खान रा. राजनगर, गोविंद मार्ट च्या बाजुला वरोरा हा आपले घरी अवैध्य शस्त्र बाळगूण आहे. अशा माहीती वरून सदर ठिकाणी पोलीस स्टॉपसह व पंचासह त्याचे राहते घराची झडती घेतली असता, घराचे तळमजल्या मधील बेडरूम मधील लाकडी बेडचे खाली १) एक लोखंडी तलवार एकुण लांबी ३२ इंच कि.अं.५००० रूपये २) एक BROOT कंपनीची काळया रंगाची लोखंडी एअर पिस्टल कि.अं. २००० रूपये व आरोपी नामे जाकीर अयुब खान यांचे ताब्यातून अॅपल कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल कि.अं.५०,००० रूपये, विवो कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल कि.अं. ४०,००० रूपये आरोपी नामे आसीफ अयुब खान याचे ताब्यातून सॅमसंग कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल कि.अं.१,००,००० रूपये असा एकुण १,९७,००० रूपये चा माल मिळून आला. नमुद आरोपी विना परवाना शस्त्र बाळगून असता मिळून आले वरून कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये सरदचा गुन्हा नोंद करण्यात आला व वरील गुन्हयात आरोपी नामे १) जाकीर अयुब खान वय ३४ वर्ष धंदा ट्रान्सपोर्ट २) आसीफ अयुब खान वय ३५ वर्ष धंदा ट्रान्सपोर्ट दोन्ही रा. राजनगर, गोविंद मार्ट च्या बाजुला वरोरा यांचे घरातून १) एक लोखंडी तलवार एकुण लांबी ३२ इंच कि.अं.५००० रूपये २) एक BROOT कंपनीची काळया रंगाची लोखंडी एअर पिस्टल कि.अं. २००० रूपये असा माल मिळून आल्याने सदर आरोपींचे कृत्य हे भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अन्वये गुन्हा होत असल्याने सदर आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर आरोपींना मा. न्यायालय वरोरा येथे पेश करण्यात आले.
वरील कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा, श्री महेश कोंडावार, पोनि. स्थागुशा चंद्रपूर, श्री अजिंक्य तांबडे, पो. नि. पोस्टे वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, पोउपनि. विनोद बुरूले स्थागुशा चंद्रपूर तसेच पोलीस स्टेशन वरोरा येथील डीबी पथकातील, पो. हेड. कॉ. दिलीप सुर, मोहन निषाद, पो. अं. संदीप मुळे, शशांक बदामवार, महेश गावतुरे, विशाल राजुरकर तसेच स्थागुशा चंद्रपूर पोलीस स्टॉफच्या मदतीने केली.