मानसिक रुग्ण महिलेवर बलात्कार व व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या आरोपीना फाशी द्या
मुख्यमंत्र्यांना निवेदनातून काँग्रेसची मागणी
घुग्घूस : कोलकाता बदलापूर येथील बलात्काराच्या घटनेचा सर्वत्र निषेध व आक्रोश शुरु असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे.
नागभीड येथे एका मानसिकरुग्ण असलेल्या महिलेला एका पुरुषाने शौचालयात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला या बलात्काराचे एका व्यक्तीने रेकॉर्डिंग करून व्हाट्सअप वर प्रसारित करून या पाशवी बलात्काराचे बाजारीकरण करून या महिलेचे सार्वजनिक स्वरूपात ही बलात्कार करणाऱ्या नीच नराधमांना जाहीर फाशी देण्यात यावी सदर प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व दोषीवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेले आहे.