म्हातारदेवी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
पाणी टाकी बनली शोभेची वस्ती
घुग्घुस : म्हातारदेवी ग्रामपंचायत मध्ये शनिवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत म्हातारदेवी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ग्रामसभेचा कोरम पुर्ण झाल्याने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
प्रचंड गोंधळात ही ग्रामसभा पार पडली. लॉयड्स मेटल्स कंपनीने म्हातारदेवी गाव दत्तक घेतले आहे. गावातून कंपनीच्या वतीने पाईप लाईन टाकण्यात येणार आहे तसेच नदी काठी पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे.
पाईप लाईन टाकण्यास ग्रामस्थानी विरोध केला आहे व गावातील नागरिकांना कंपनीत कामावर घेण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे नातेवाईक व समर्थक शंकर उईके, हर्षल पाझारे, प्रिया गोहने, मयुर मडकाम, कुणाल सावे, स्वप्नील आत्राम, विशाल मांडवकर, रोशन बोरकुटे, यांना लॉयड्स मेटल्स कंपनीत कामावर घेण्यात येणार असल्याची चर्चा ग्रामवासियांत आहे.
पाण्याची टाकीला ४ वर्षे झाली परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे ही पाण्याची टाकी शोभेची वस्तू ठरली आहे. पाणी कर १, २०० रुपये घेण्यात येते आणि घर टॅक्स मनमानी घेण्यात येते. सरपंच संध्या पाटील हे लॉयड्स मेटल्स कंपनीत कामावर लावण्यासाठी भेदभाव करीत असल्याचा आरोप ग्रामवासी करीत आहे.
यावेळी तंमुस अध्यक्ष सुरेंद्र झाडे, बंडू बरडे, सुरज सातपुते, नितीन भोंगळे, लता सावे, हर्षल बोन्डे, तानेबाई वाघमारे, अल्का मोहुर्ले, उषा मेश्राम, छाया सावे, कुसुम लोखंडे, शिला वाघमारे, किरण कोहचाडे, मनोहर मेश्राम, सुलभा सुरतेकर, शालू पचारे, ज्योती वैरागडे, रत्नमाला कुळमेथे आदींची उपस्थिती होती.