ट्रकसह 35 लाखाचा सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त

28

ट्रकसह 35 लाखाचा सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त


दोन आरोपीना पोलिसने केली अटक


 

 दि.18/10/2024 रोजी सकाळी मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक – 2024 चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारुबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक पांढरे रंगाचा आयसर कंमाक सीजी-07 सीक्यु 4602 मधुन महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तम्बाकु व पानमसाला या अन्नपदार्थाच्या विकीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैधरित्या वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने विधानसभा निवडणुक -2024 एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) ता. सावली येथे भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/नितेश महात्मे, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल गारघाटे, पोअं/प्रमोद डंबारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर येथील कर्मचारी यांचेसह नाकाबंदी करून नमुद वाहन चेक केले असता त्यामध्ये लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवुन ठेवलेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला मजा 108 सुंगधित हुक्का शिशा तंबाखुचे 200 ग्रॅम वजनाचे 1680 बॉक्स, 50 ग्रॅम वजनाचे 1800 बॉक्स एकुण कि. 19,93,800/- रु व जप्त वाहन कि. 15,000,000/-रु असा एकुण 34,93,800/- रु चा माल पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला आहे.

 जप्त वाहनाचे चालक इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी, वय 27 वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. इस्लामनगर वॉर्ड नं.4, सुफेला, ता. भिलाई, जि.दुर्ग, छत्तीसगड, संतोष कुमार सुंदर सिंह, वय 47 वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. पयली, ता. शहपुरा, जि.डिंडोरी, मध्यप्रदेश यांचेविरुध्द सरकारतर्फ पोउपनि संतोष निंभोरकर यांनी दिलेल्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन सावली येथे गु.र.नं – – 233/2024 कलम 30 (2) (अ), 26(2) (i),26 (2) (iv), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधि.2006, सहकलम 223,275,123 भा.न्या. सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि दिपक कांकेडवार, स्था.गु.शा चंद्रपूर हे करीत आहे.

 कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, भगत उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्था.गु.शा चंद्रपूर, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा / चेतन गज्जलवार, पोहवा/नितेश महात्मे, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल गारघाटे, पोअं/प्रमोद डंबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here