निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते, मंत्र्यांकडून बेरोजगारांची थट्टा, राजू झोडे
- चंद्रपुर :
चंद्रपुरात दोन दिवसीय इंडस्ट्रियल एक्स्पो महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या एक्स्पोच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात अनेक उद्योग, कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. वनमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. मात्र या मेळाव्यात निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांची एकप्रकारे थट्टा करण्यात येत असून भाजपचे मंत्री व नेते सुशिक्षित बेरोजगारांना भूलथापा देत असल्याचे उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आधीच इतके उद्योग आहेत. विविध कंपन्यांमध्ये परप्रांततुन येणाऱ्यांना रोजगार मिळतो. मात्र, स्थानिक युवक सुशिक्षित बेरोजगार यापासून वंचित आहेत. या मेळाव्याचा उद्देश हा स्थानिकांना रोजगार देण्याचा नसून निव्वळ आपली प्रसिद्धी करण्याचा आहे. आधीच सुरू असलेल्या उद्योगांमध्ये 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळाला असता. त्यातही उद्योग येतात अशी दवंडी पिटवली जाते.हा निव्वळ बेरोजगारांना भूलथापा देण्याचा प्रयत्न असून प्रत्यक्षात भाजपच्या मंत्र्यांनी कृती अमलात आणावी, बेरोजगारांची थट्टा करणे बंद करावे अशीच थट्टा मागच्या पंचवार्षी मघ्ये भाऊ तुम्ही केली अशी टीका राजू झोडे यांनी केली आहे.