नागभीड़ : दिनाक 05.07.2025 रोजी फिर्यादी विक्रम सिंग वृजेद्र सिंग, वय 42 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. माजिगावान तह. मनगवा जि. रिवा (म.प्र.) ह. मु. संतोष सिलवेरी याचे घरी ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर यानी पोलीस स्टेशन नागभिड येथे रिपोर्ट दिला की, अशोका बिल्डकॉन लि. नाशिक कंपनीला गडचिरोली सर्कल अंतर्गत ब्रम्हपुरी डिव्हीजनमधील नागभिड तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन पोल उभे करून तार जोडणीचे काम (RDSS T-१०) मिळाले होते. अशोका बिल्डकॉन लि. नाशिक कंपनीने नागभिड तालुक्यातील मिंडाळा ते किटाळी मेढा फिडर सेपरेशन ईलेक्ट्रीक पोल उभे करून तार जोडणीचे काम मे. प्रकाश एंटरप्रायजेसचे मालक प्रो. अजयकुमार वृजकिशोर मिश्रा रा. वार्ड न. 2, एपीएसयु रोड पुरैना-380, तह सुनौरा, जि रिवा (म.प्र) याना दिले होते. त्याबाबत त्याना दि. 26.12.24 रोजी वर्क ऑडर न. AERDPL/१४५८/०२६ देण्यात आला होता.
सदर काम करण्याकरीता अशोका विल्डकॉन कंपनीचे गडचिरोली डेपोमधुन दि. 07.02.25 रोजी 100 तर दि.03.03. 2025 रोजी 90 लोखंडी ईलेक्ट्रीक पोल (9 मिटर लांबीचे) असे एकुण 190 लोखंडी ईलेक्ट्रीक पोल त्याना उपलब्ध करून देण्यात आले होते. पंरतु मे. प्रकाश एंटरप्रायजेसचे मालक प्रो. अजयकुमार वृजकिशोर मिश्रा रा. वार्ड न. 2, ए.पी.एस.यु रोड पुरैना-380, तह सुनौरा, जि रिवा (म.प्र) यानी वर्क ऑडर प्रमाणे मिंडाळा ते किटाळी tv मेढा येथील फिडर सेपरेशन करीता ईलेक्ट्रीक पोल उभे करून तार जोडणीचे काम पुर्ण करून देणे अपेक्षित होते.
परंतु त्यांनी दि. 15.03.25 रोजी दुपारी 04.00 वा. ते दि. 20.04.2025 रोजी दुपारी 12.00 वा. या कालवधीत 9 मिटर लांबीचे 127 नग आर. जे. एस कंपनीचे लोखंडी ईलेक्ट्रीक पोल प्रत्येकी किंमत 10,221/- रूपये प्रमाणे एकुण किंमत 12,98,150/- रूपयाची परस्पर विल्हेवाट लावुन अशोका बिल्डकॉन लि. नाशिक कपंनीचा अन्यायाने विश्वासघात करून फसवणूक केली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो. स्टे नागभीड अपराध क्रं. 213/2025 कलम 316 (2), 318 (4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक. मम्मुका सुदर्शन अपर पो. अ.. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय अधिकारी. दिनकर ठोसरे सा, मा. पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात स.पो.नी दिलीप पोटभरे, पोहवा दीपक कोडापे, पोहवा विनोद गायकवाड, पो.अं. भरत घोळवे, पो.अं. अवधूत खोब्रागडे, पो.अं. जय रोहणकर, पो.अं. विक्रम आत्राम यांनी गुन्ह्यातील आरोपी १) अजयकुमार मिश्रा रा. रिवा मध्यप्रदेश, २) गेंदलाल गुहाराम शाहू रा. बिटाल छत्तीसगह, ३) ट्रेलर चालक धनराज तोडेलेलं सूर्यवशी रा. नागपूर यांना अटक करून गुन्ह्यात वापरलेले १) एक पांढऱ्या रंगाची चारचाकी अल्टो वाहन किं. २,५०,०००/-रूपये २) ट्रॅक ट्रेलर किं. ७,५०,०००/-रूपये ३) ९ मिटर लंबीचे इलेक्ट्रिक लोखंडी पोल ११४ नग किमत ११,६५,१९४/- रु असा एकुन २१,६५, १९४/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.