चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका येतील विसापूर गावात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 18 जुलै शुक्रवार रोजी दुपारी अंदाजे 4 च्या सुमारास घडली दुर्गा प्रकाश चिंचोलकर वय वर्ष 19 असे मृत तरुणीचे नाव असल्याचे कळले प्राप्त माहिती नुसार दुर्गाच्या वडिलाचे काही महीण्यापूर्वी निधन झाले होते ती आई आणि भावासोबत राहत होती घटनेच्या वेळी तिची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती तर भाऊ देखील घरी नव्हता या दरम्यान दुर्गाने घरातील पंख्ख्याला दोरी बांदून गळफास घेतला सदर घटनेची माहिती मिळताच विसापूर पोलीस चौकीचे कर्मचारी अजय झोडे आणि राकेश मेंढे घटनास्थळी पोहचले त्यावेळी दुर्गा मृत अवस्थेत आढळली पंचनामा करून तिचा मृतदेह शवविछेदनासाठी बल्लापूर ग्रामीण रुग्णालय हळविण्यात आला या प्रकरणी विसापूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक करिष्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकची तपास सुरु आहे आत्महतेचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाहीसदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ वेक्त होत आहे