Home Breaking News *राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शासकिय अभियानांतर्गत “एक पेड माँ के नाम”...

*राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शासकिय अभियानांतर्गत “एक पेड माँ के नाम” कार्यक्रम उत्साहात संपन्न

50

*राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शासकिय अभियानांतर्गत “एक पेड माँ के नाम” कार्यक्रम उत्साहात संपन्न



*वणी*–
श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, वणी द्वारा संचालित, राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालययात शासकीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.”एक पेड माँ के नाम “या अभियानांतर्गत वृक्षारोपण, माता पालक संघ,शिक्षक पालक सभा, हरित सेना, नशा मुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जयवंतराव सोनटक्के उपमुख्याधिकारी, नगरपरिषद,वणी.हे होते.प्रमुख अतिथी म्हणून श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री.विक्रांत चचडा सर उपस्थित होते. अतिथी म्हणुन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रचे प्राचार्य मा.श्री. अतुल राजगडकर सर, तसेच राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.अभय पारखी सर तसेच समारोहाच्या अध्यक्षस्थानी वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य मा. श्री.राकेशजी देशपांडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. आई आणि वृक्ष हे दोघेही आपाल्याला भरभरून देतात,यांच्यामुळेच जीवन समृद्ध, सुंदर होते.असे प्रतिपादन कवि, साहित्यिक उपमुख्याधिकारी नगरपरिषद वणी श्री जयंतराव सोनटक्के सरानी भाषणातून व्यक्त केले असून आज झाडे लावली व जगवणे हि काळाची गरज आहे असेही अधोरेखित केले.यानंतर राकेशजी देशपांडे सर, अतुल
राजगडकर प्राचार्य शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांनी झाडांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री.अभय पारखी सरानी भाषणातून
शासकीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमांची माहिती दिली आणि एक पेड माँ के नाम, या विषयावर अधिक माहिती दिली. यावेळी माता पालक सभा घेण्यात आली.या
कार्यक्रमात पालकांचा सहभाग मोठ्या संख्येने उपस्थित होते, पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रभुदास नगराळे सरांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गंगारेड्डी बोडखे सरांनी केले तर आभारप्रदर्शन श्री.तुषार घाणे सर यांनी केले.
शेवटी कार्यमाची सांगता वृक्षारोपणाने पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सौ.अनिता टोंगे, श्री. प्रतिष लखमापूरे,कु भाग्यश्री लांडे व शिक्षकेतर कर्मचारी श्री.राजे‌ंद्र देवतळे, श्री.जितेंद्र डगावकर, श्री. हरीष बोढाले श्री.सुनिल गेडाम, श्री.हरीष वासेकर व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here