येनक येथील अतीवृष्टीमुळे खराब झांलेल्या पांदन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा.
अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभा तहसिल कार्यालयासमोर धरणे देऊन बेमुदत बसणार
वणी*–वणी तालुक्यातील येनक गावाशीवारातील येनक ते शेवाळा पांदन रस्त्याचे दरवर्षी पेक्ष्या या वर्षी अतिवूष्टीच्या पावसाने पांदन रस्ता खूप खराब झांला आहे त्या रस्त्याने साधे पायदळ जाणे शक्य होत नाही. तर त्या रस्त्याने जाणारी शेतकरी व शेतमजूर यांचे खूप हाल होत आहे शेतात जायचे असल्यास तीन ते चार किलोमीटर च्या अंतराने केल्याने शेतामध्ये जावे लागत असल्याने अतिवृष्टीने शेतातील सगळे पीक खराब होऊन प्रचंड नुकसान झाले आहे.बाकी काही थोडेफार शिल्लक राहिलेले पीक वाचवण्यासाठी येनक येथील शेतकऱ्याकडून खूप धडपड चालू आहे मात्र शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. असे भयान वास्तव असल्याने मोठी चिंतेची बाब बनली आहे.शेतकरयांना दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक व मानसिक नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तात्पुरता रस्ता तयार करून घेण्यात यावा. अशी मागणी येनक येथिल रणजीत बोन्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली. यावेळी प्रवीण पडीले, प्रभुदास दरेकर, नंदकिशोर उपासे, संदीप मांडवकर, संजय पंडित, वासुदेव आत्राम, कुशल गारघाटे यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य किसान सभेने येनक येथील शेतकरयांना घेऊन उपरोक्त प्रश्नासाठी किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल हेपट, तालुका सचिव कॉ.रवि गोरे व भाकपचे तालुका सचिव कॉ.मोरेश्वर कुंटलवार यांचे नेत्रुत्वात वणी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे आवाहन केले.