Home Breaking News ग्रामीण भागातील विधुत पुरवठा अंडरग्राऊंड करण्याची मागणी

ग्रामीण भागातील विधुत पुरवठा अंडरग्राऊंड करण्याची मागणी

44

ग्रामीण भागातील विधुत पुरवठा अंडरग्राऊंड करण्याची मागणी



नितेश केराम
कोरपना ग्रामीण भागात वारंवार होणारे वादळ जोरदार वारे पावसाळ्यातील झाडे पडणे तसेच वाढते उष्ण वातावरण यामुळे वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे त्यामुळे नागरिक शेतकरी व्यापारी व विध्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या पार्शभूमीवर ग्रामीण भागातील सम्पूर्ण विधुत पुरवठा यंत्रणा अंडरग्राऊंड करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सद्या अनेक गावांमध्ये विजेच्या उघड्या तारांमुळे तांत्रिक बिघाड वारंवार निर्माण होतात वादळ किंवा पावसाच्या काळात तारा तुटणे पोल कोसळणे शॉर्टसर्किट होणे यामुळे तासनतास वीज पुरवठा खंडीत राहतो याचा परिणाम शेती पंप पाणी पुरवठा इंटरनेट सेवा लघुउद्योग तसेच दैनंदिन जीवनावर होत आहे अंडरग्राऊंड वीज वाहिन्या केल्यास वादळ पाऊस किंवा उष्णतेचा परिणाम कमी होऊन अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा शक्य होईल तसेच विजेची चोरी रोखन्यास मदत होईल वारंवार करावी लागणारी दुरुस्ती व मेंटेनन्सचा खर्चही कमी होईल
नागरिकांच्या मते शहरांच प्रमाणे ग्रामीण भागातही आधुनिक व सुरक्षित वीज व्यवस्था उभारन्याची गरज आहे शासन व महावितरने या कडे गांभीर्याने लक्ष देऊन टप्याटप्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा अंडरग्राऊंड करण्याची योजना राबवावी अशी मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here