*भारतीय जनता पार्टी, घुग्घूस नगरपरिषद निवडणूक 2025 बैठक संपन्न…

33

*भारतीय जनता पार्टी, घुग्घूस नगरपरिषद निवडणूक 2025 बैठक संपन्न…

घुग्घूस नगरपरिषद निवडणुक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी तर्फे घुग्घूस येथे कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत संघटनाची बांधणी, बूथस्तरावरील तयारी आणि आगामी निवडणुकीसंदर्भातील विविध नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी *राजुरा मतदार संघाचे आमदार श्री. देवरावजी भोंगळे* उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक प्रक्रिया, जनसंपर्क मोहीम आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींचे मार्गदर्शन केले. तसेच एकजूट, शिस्त आणि संघटनात्मक ताकद या माध्यमातून घुग्घूस नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा अभिमानाने फडकवू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here