काँगेसच्या माजी जि.प.बालकल्याण सभापतीसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश !
आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन घेतला पक्षप्रवेशाचा निर्णय*
राजुरा: राजुरा विधानसभा मतदारसंघात जनतेच्या मूलभूत गरजा, विकासकामे आणि शासकीय योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात (दि.१६ ) ला काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती सुभद्रा कोटनाके आणि भुरकुंडा (बू) ग्राम पंचायतीचे माजी सदस्य सुनील सुरपाम यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विविध विकासकामांना गती देत समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे कार्य सुरू असल्याचेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती सुभद्रा कोटनाके व भुरकुंडा (बू) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील सुरपाम यांचे आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपात स्वागत केले. या प्रवेशामुळे भाजपा अधिक बळकट होत असून आगामी काळात विकासकामांना आणखी चालना मिळणार असल्याची ग्वाही आमदार भोंगळे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी आदिवासी नेते बाबुराव मडावी, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, विनोद नरेंदूलवार, बंडू माणूसमारे, भाऊराव बोबडे, मारोती शेंडे, अशोक सुर्तेकर, बालाजी निकोडे, इंदिरा लोहबडे, विक्रम नागोसे, तुकाराम ढुमने, तुकाराम कोटरंगे ,परशुराम वाडगुरे, मालुदेव कोंडेकर यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.