राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

19

राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा



वणी –येथिल श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे
ज्येष्ठ शिक्षक श्री. गंगारेड्डी बोडखे सर हे अध्यक्षस्थानी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पनाने झाले. संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून त्यामुळे भारतीय प्रत्येक व्यक्तीला आपले प्रगती साधण्याचा आणि सन्मानाने जगन्याचा मार्ग सुकर झाला आहे.तद्वतच संविधानाची व्याख्या आणि उद्देशिकेचे अर्थ अतिशय सोपे करून सांगितले.
असे ते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमात विविध सहशालेय उपक्रम राबविण्यात आली भाषण स्पर्धा, कविता पठन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा आदि स्पर्धा घेण्यात आले. स्पर्धेत एकूण 106
विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवून शाळेत उत्सुकता निर्माण झाली.
प्रामुख्याने चित्रकला स्पर्धेत वर्ग 9वी ची विद्यार्थीनी कु. भूमिका धुर्वे हिने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आणि तद्वतच भाषण स्पर्धेत वर्ग 9 वी ची विद्यार्थिनी कु.आकांक्षा तिवारी तर कविता पठन स्पर्धेत वर्ग 7वीची विद्यार्थिनी कु आंचल प्रजापती आणि भाषण स्पर्धेत कोमल तिवारी, पूर्वी राऊतिया यांचा क्रमांक आला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून अध्यक्षांच्या हस्ते पेनी उपहार म्हणून भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतिश लखमापुरे सरांनी केले तर आभारप्रदशर्रन श्री. प्रभुदास नगराळे सरांनी मानले. कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रतिज्ञेने झाली.यशस्वितेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here