*भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, व ओबीसी समजासाठी भरीव काहीच नाही…*

39

*भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, व ओबीसी समजासाठी भरीव काहीच नाही…*

*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका*

गडचिरोली – देशात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने जनतेत आश्वासनांची खैरात वाटली. मात्र सत्तेवर येताच दिलेली आश्वासने हवेत विरली. गेल्या दहा वर्षात देशात महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड दरवाढ, शेतकरी कष्टकरी कामगार तसेच मागासवर्गात मोडणाऱ्यांचे अवहेलनाच करण्यात आली. खोटे बोलून जनतेची लूट करीत व्यापारी ही जोपासणाऱ्या भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले म्हणून अशा भाजप सरकारचा हिशोब चुकता करा, अशी टीका करीत आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मतदान करून जनहिताच्या प्रश्नांसाठी लढणारे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित गडचिरोली जिल्हयातील भामरागड, घोट कोरेगाव (चोप) येथे सभेला संबोधित करताना बोलत होते.

यावेळी मंचावर इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, तसेच महाविकास आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तथा मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकारने देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. खते औषध यांची किंमती वाढवल्या. यामुळे शेतकऱ्यांची लागवडी खर्चात प्रचंड वाढ झाली व उत्पादनाला हमीभाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. भाजपच्या जाहीरनामातही मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी काहीच योजना नाही उलट इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात ओबीसींची जातीनिहाय जनगणना, महिलांना एक लाख रुपये सन्मान निधी, तरुणांना विद्यावेतन आणि शेतकऱ्यांना हमीभाव असा पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचे अभिवचन जाहीरनाम्यात दिले आहे. सोबतच इंडिया आघाडीचे सरकार आल्यास संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असून कृषी प्रधान देशातील बळीराजाचे हात बळकट करण्याचे काम करणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. तर भाजपाने याउलट घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ केली होती आता निवडणुकीच्या तोंडावर तीनशे रुपये घट करून पुन्हा सत्तेत आल्यास सिलेंडर ६०० रुपयांनी महागणार असेही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्व तालुक्यात लोडशेडिंग सुरू असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर खासदार म्हणून निवडून गेलेले अशोक नेते हे मात्र झोपा काढण्यात मग्न आहे.तर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा पालक मंत्री होणार असे सांगत असून बारा तासाचे लोड शेडिंग 24 तासावर नेणार काय असा सवालही यावेळी उपस्थित केला. नुकतीच सरकारकडून वीज दरवाढ करण्यात आली. जनतेला महागाईच्या काहीच लुटून देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे व उद्योगपतींसाठी सरकार चालवणारे हे सरकार नकोशी वाटत असून राज्यातील तीन तिघाडा काम बिघाडात सरकारमुळे संपूर्ण राज्य ही उध्वस्त झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. देशावर ओढवलेली ही परिस्थिती फक्त हात म्हणजे पंजाब बदलू शकते. म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात इंडियाआघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित जनतेला केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here