ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक/ विश्व सिकलसेल दिवस उत्साहात साजरा.

30

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक/ विश्व सिकलसेल दिवस उत्साहात साजरा.

 वरोरा :
दिनांक १९ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सौ अनिता ठाकरे प्रयोगशाळा तज्ञ उपस्थित होते.मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या वर्षिची थिम आहे “””‘प्रगती से जगी आशा :-सिकलसेल केअर को वैश्विक रुप से एडवांस बनाया जाए :-“‘”‘.विश्व सिकल सेल जागरूक दिवस २०२४ Hope Through Progress :- Advancing Sickle Cell Care Globally ही आहे.श्री सतीश येडे आरोग्य सहाय्यक अधीक्षक यांनी प्रास्ताविक केले . प्रास्ताविकात त्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना समजून सांगितली.सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी जागतिक विश्व सिकलसेल दिवस आजारांबाबत उपाययोजना, काळजी, आहारविहार, जिवन शैली, व्यायाम प्राणायाम मेडिटेशन, याविषयी मार्गदर्शन केले. आहारामध्ये रक्तवाढ करणार्या पदार्थाचा वापर करणे,पाणी भरपूर पिणे, सकारात्मक विचार करून आजाराबाबतची काळ्जी घेणें.आहे ते आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे.तसेच जे सिकलसेल आजारानै पाॉझिटीव्ह आहे त्यांनी मुलाबाळांना जन्म न देता एखादे मुलं दत्तक घ्यावे कारण त्या अनाथ मुलांना आईवडील मिळेल व तुम्हाला या आजाराचे ग्रस्त मुलं मीळणिर नाही कारणं तुमचं स्वतांच मुलं हेही या आजाराने ग्रासलेल राहू शकतं.म्हणून माणुसकी या नात्याने व पुढिल गांभीर्य लक्षात घेता हे उत्तम काम आपणं करुन एक आदर्श निर्माण करू शकतो.आणी आनंदी जीवन जगू शकतो.डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी या रोगांचे लक्षण, कारणं, औषधोपचार,चाचणी याविषयी मार्गदर्शन केले.लग्न करतांना कुंडली बघण्यापेक्षा सीकलसेल तपासणी दोन्ही व्यक्तीने करणे जरुरीचे आहे.या विषयी मार्गदर्शन केले.सूत्र संचालन सोनाली राईसपाईले व आभारप्रदर्शन पुनम धांडे यांनी केले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी एकाच घरातील ४ व्यक्ती सिकलसेल ग्रस्त असलेल्यांची मूलाखत घेतलीं.सर्वांना हा आजार कसा झाला.कधी झाला.काय काय करतात.जिवन कसं घालवतात या विषयी कौन्सिलिंग केले.व त्यांना चांगल्या आरोग्यदायी जिवनाच्या शूभेच्छा दिल्या.त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले कारणं त्यांनीं या गंभीर रोगांवर मात करून आरोग्यदायी जिवनशैलीत जिवन आनंदाने जगत आहे.आणी दूसर्यांना प्रेरणा देता येईल असा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले आहे.या कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका,पूनम धांडे, प्रियंका दांडेकर, कूंदा मडावी, व्रुशाली दहेकर यांनी मेहनत घेतली.सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात विश्व सिकल सेल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व रुग्ण नातेवाईक व उपस्थितांना माहीति पत्रक देवून जनजागृती प्रचार व प्रसार करण्यांत आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here