घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समीतीतील सदस्याची अविरोध निवड
घुग्घुस:
जितेंद्र गादेवार मुख्याधिकारी घुगुस शहर फेरीवाला समिती मधील 08 निर्वाचित जगासाठी निवडणूक घेण्यात आली असून त्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री जितेंद्र गादेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
शहर फेरीवाला समिती ही 20 सदस्य समिती असून त्यामधील 08 सदस्य फेरीवाल्या मधून निवडून द्यायचे असतात,
विशेष म्हणजे शहरातील सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहेत
ही समिती एकंदरीत फेरीवाले आणि स्थानिक प्राधिकरण यांच्यातील दुवा असून फेरीवाल्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असते
घुग्गुस नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समितीतील सदस्यांची अविरोध निवड.
घुग्गुस नगरपरिषद अंतर्गत शहर फेरीवाला समिती मधील 8 निर्वाचित जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.या निवडणुकीसाठी मा.कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशान्वये घुग्गुस न. प.क्षेत्रातील फेरीवाला निवडणूक पार पडण्याकरिता घुग्गुस न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सदर निवडणूक ही अविरोध झाली असून त्यात सर्वसाधारण खुला प्रवर्ग गटातून अमोल माधव क्षीरसागर.श्री विनोद विजय भगत.तसेच सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला राखीव गटातून श्रीमती शोभा भुजंगराव उमरे तर अनुसूचीत जाती महिला राखीव गटातून श्रीमती विद्या अतिश डहाळे इतर मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून श्रीमती प्रतिभा प्रकाश जोगी अल्पसंख्याक गटातून शबिब इब्राहिम शेख व विकलांग/ दिव्यांग गटातून श्री मुनाफ अली मुजहिद हुसेन हे सदस्य अविरोध निवडून आले तर अनुसूचीत जमाती करिता कुणाचेही नामनिर्देशन सादर न झाल्याने ती जागा रिक्त आहे.
निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र गादेवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी यांच्या दालनात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.